क्रिकेट स्पर्धेत भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश स्कूलचा डंका


Dr. Ulhas Patil English School in Bhusawal suffers defeat in cricket tournament भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये 14, 17 व 19 वर्षातील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धां झाल्या.

भुसावळ तालुका क्रिकेट स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळचा 17 वर्षाखाली मुलांच्या संघाने बियाणी मिलिटरी स्कूलच्या संघावर नऊ गडी राखून विजय मिळवला व डॉ.उल्हास पाटील स्कूलची जळगाव जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली.






या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील. डॉ.वैभव पाटील, मुख्याध्यापिका अनघा पाटील आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक याकूब शेख, विनय काळे, आरीफ कुरैशी यांचे मार्गदर्शन लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !