जात प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या ; भुसावळातील आदिवासी कोळी समाजातर्फे निषेध


Student commits suicide after not getting caste certificate; Protest by tribal Koli community in Bhusawal भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावातील शिवाजी वाल्मीक कोळी मेलके (32) या आदिवासी कोळी समाजातील विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेविरोधात आदिवासी कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा
दोन वर्षांपूर्वी मेलके यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र दीर्घकाळ उलटूनही त्यांना प्रमाणपत्र न मिळाल्याने नैराश्येतून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी निष्काळजी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवला नाही, तर महाराष्ट्रभर आदिवासी समाजातर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल आदिवासी कोळी समाजाने दिला आहे.






या निषेधार्थ व अन्यायाविरोधात भुसावळ तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांनी बुधवारी सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयात मोठ्या संख्येने जमा होऊन मागण्याचे निवेदन दिले. निवेदनावर रुपाली सूर्यवंशी, जितेंद्र सपकाळे, नारायण कोळी, भरत पाटील, मंजिल कोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व समाजबांधवांची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !