भुसावळात सात ठिकाणी रक्तदान शिबिरे : 448 रक्तदात्यांचा सहभाग


Blood donation camps held at seven places in Bhusawal : 448 blood donors participated भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या आशीर्वादाने अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद (अभातेयुप) तर्फे देशभरात मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह’अंतर्गत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा भाग म्हणून भुसावळ तेरापंथ युवक परिषदेतर्फे सकल जैन समाजाच्या सहकार्याने शहरात तब्बल सात ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यात एकूण 448 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.

मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते उद्घाटन
ही शिबिरे तेरापंथ भवनासह शहरातील विविध ठिकाणी आयोजीत केली. उपक्रमाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करून नागरिकांना या पुण्य कार्यात सक्रिय होण्याचे आवाहन केले.


या अभियानात खान्देश सभा अध्यक्ष रवींद्र निमाणी, तेरापंथ सभा अध्यक्ष गल्लूदास छाजेड, स्थानकवासी समाज संघपति जयंतीलाल सुराणा, दिगंबर जैन संस्थान अध्यक्ष सतीश साखरे, मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्हचे महाराष्ट्र प्रभारी देवेंद्र निमाणी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन झाले. रक्तदान शिबिर सकाळी 9 ते संध्यकाळी पाच वाजेपर्यत सुरू होते. शहरातील विविध रक्तदान केद्रावर संध्यकाळपर्यत रक्तदात्यांनी गर्दी केली होती. सामाजिक उपक्रम असल्याने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष सुमेश सांखला, मंत्री अभय छाजेड, अंकुश चोरडिया, पंकज छाजेड, अभय सुराणा, जय निमाणी आदींनी परिश्रम घेतले. सुपात्र ग्रुपचे देवेंद्र मेहता,समकित सिसोदिया आदींनी योगदान दिले.

अभियानासाठी देशभरात 7500 हून अधिक शिबिरांचे आयोजन झाले. चार हजार ब्लड बँका, पाच हजार डॉक्टर, एक लाख टेक्निशियन आणि एक लाख स्वयंसेवक यांच्या मदतीने हा उपक्रम पार पडला. अभातेयुपने जागतिक विक्रम नोंदवून देशभरात रक्तदानाचा उत्सव साजरा केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !