भालोद महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
विद्यार्थ्यांनो ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यासाने यशाचे शिखर गाठा : प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे
Students, set goals and reach the pinnacle of success through planned studies: Principal Dr. Kishore Kolhe भालोद (19 सप्टेंबर 2025) : शिक्षणाने मानवी क्षमतांचा विकास होऊन जीवनात सकारात्मक परिवर्तन करता येते. आपले व परिवाराचे जीवन आनंददायी करण्यासाठी विद्यार्थ्यांनो ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यासाने यशाचे शिखर गाठा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी केले.
कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण आणि पीएचडी प्राप्त माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे हे होते.





प्रमुख अतिथी हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.अजय कोल्हे , उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, प्रा. डॉ.जतीन मेढे , राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे आदी मान्यवर होते .
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. निलेश पाटील (सहाय्यक प्राध्यापक धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैजपूर ), साहिल संजय तडवी (खिरडी तालुका रावेर),प्रा. राकेश बर्डे (सहाय्यक प्राध्यापक के.नारखेडे महाविद्यालय भुसावळ),प्रा.शैलजा इंगळे (सहाय्यक प्राध्यापक संगणक शास्त्र विभाग कला व विज्ञान महाविद्यालय भालोद) यांनी प्राध्यापक पदासाठीची नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तर प्रा. डॉ.राकेश चौधरी (रसायनशास्त्र विभाग कला व विज्ञान महाविद्यालय भालोद),प्रा.डॉ.उज्वला महाजन (अर्थशास्त्र विभाग प्रमुख पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल या यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,शाल,प्रेरणादायी पुस्तक भेट म्हणून देण्यात आले
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणालेत की , विद्यार्थ्यांनो जीवनातील प्रतिकूल परिस्थितीशी हिमतीने संघर्ष करा. प्रतिकूल परिस्थितीच व्यक्तीला जीवन जगण्याचे आणि यशस्वी होण्याचे बळ देते. जो अधिक विपरीत परिस्थितीशी संघर्ष करतो तोच जीवनामध्ये यशस्वी माणूस होत असतो. शिक्षणातूनच व्यक्ती आणि समाज उन्नत होत असतो त्यासाठी विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करून ज्ञानवंत होऊन यशवंत व्हा ! आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो हे विचार समोर ठेवून वाटचाल करीत रहा. तुम्ही यशवंत झाल्याशिवाय राहणार नाही
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.याप्रसंगी विविध शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोगत संपन्न झाले. ग्रामीण भागातून विशेषता शेतकरी शेतमजूर, आदिवासी कुटुंबातून आलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील प्रतिकूल परिस्थितीचे अनेक उदाहरणे सांगून त्यांनी या परिस्थितीवर कशी मात केली . हा त्यांचा जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. त्यांच्या या संघर्षमय जीवन प्रवासाला उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी वेळोवेळी दाद देऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले.
प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व आयोजक प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी तर आभार प्रा .डॉ.दिनेश पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांनी केले .
कार्यक्रमास प्रा.डॉ.किरण चौधरी, प्रा.डॉ. गणेश चौधरी, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.मोहिनी तायडे, प्रा.चंद्रकांत वानखेडे, प्रा.काशिनाथ पाटील,प्रा.डॉ. वसंत पवार,प्रा.डॉ. पद्माकर सावळे,प्रा.डॉ. आशुतोष वर्डीकर,प्रा.डॉ. दिनेश महाजन,प्रा. दिगंबर खोब्रागडे,प्रा. हेमलता कोल्हे,प्रा. शैलजा इंगळे,प्रा. जान्हवी परतणे, प्रा. गीतांजली चौधरी, प्रा.फाल्गुनी राणे,प्रा.भावना प्रजापती, प्रा.अजय गायकवाड, मुबारक तडवी, तुळशीराम पाटील, पंकज नेहेते, किशोर चौधरी,श्री. कल्याण चौधरी, बालकृष्ण चौधरी, रूपम बेंडाळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
