बहिणाबाई मॉल व सभागृह लवकरच महिला बचत गटासाठी उभे करणार ! : आमदार अमोल जावळे
यावल येथील मनोकामना लोकसंचलीत साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा
Bahinabai Mall and auditorium will soon be set up for women’s self-help groups!: MLA Amol Javale यावल (19 सप्टेंबर 2025) : महिला संक्षमीकरण करीता आपण स्वता:हा पुढाकार घेवु व पुढील काळात लवकरच महिला बचत गटासाठी बहिणाबाई मॉल व सभागृह शहरासह विविध गावात उभे करणार असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले ते शहरातील मनोकामना लोकसंचलीत साधन केंद्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. शहरात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित मनोकामना लोकसंचलीत साधन केंद्र यावल यांची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्सवात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे होते.
लवकरच उभारणार सभागृह
आमदार जावळे म्हणाले की, बचत गटासाठी बहिणाबाई मॉल व सभागृहाची आपली संकल्पना आहे व शहरात आणी ग्रामिण भागात बचत गटाच्या महिलांसाठी मॉल आणी सभागृह उभे करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले. तसेच या कार्यक्रमात महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.





यांची होती उपस्थिती
यावेळी युवराज पाटील, सतीश साळुंके, परेश गाडे, निर्मला पाटील, ज्योती पाचपांडे, हेमन्त फेगडे, नितीन कुलकर्णी, सलीम तडवी, जयश्री खोडपे, मिना तडवी, छाया चव्हाण यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शारदा पाटील यांनी प्रस्तावना आशिष मोरे यांनी मांडली तसेच आभार प्रदर्शन जावेद तडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया कोळी, वंदना पाटील, अलका बाविस्कर, राजश्री पाटील, पंकज बागुल, रंजना अहिरे सह आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यकारणी व बचत गटातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
यांनी केले मार्गदर्शन
या प्रसंगी महिला व बाल विकास अधिकारी अर्चना आटोळे यांनी बालविवाह, महिला अत्याचार याविषयी मार्गदर्शन केले. तर प्रतिक पाटील यांनी संरक्षक महिला कायदे कायदेशीर प्रक्रिया यावर यांनी मार्गदर्शन केले. विभागीय सल्लगार शैलेश पाटील यांनी शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक अधिकारी सुमेध तायडे यांनी शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले. उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र जळगाव ललीत तावडे यांनी उद्योग विषयी मार्गदर्शन केले. युनुस तडवी पेसा समन्वयक यांनी महिला उद्योजक कसे बनावे मार्गदर्शन केले. वसंत संदानशिव समुपदेशक यांनीही आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. सचिन बर्डे यांनीही शासकीय बँक विमा बाबत माहिती दिली.
