यावलमधील शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात
Former corporator of Shiv Sena Ubatha in Yaval joins BJP along with hundreds of workers यावल (19 सप्टेंबर 2025) : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून शहरात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली आहे. मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तसेच बाजार समितीचे संचालक सुनील बारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सह त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.
आमदारांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. शहरातील तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात मंगळवारी भाजपाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये यावल नगरपालिकेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील बारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला.





आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तसेच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या संख्येत भाजपामध्ये इन्कमिंग सुरू आहे. आमदार अमोल जावळे यांच्यासह या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, जिल्हा परिषद चे माजी गटनेचा प्रभाकर सोनवणे, डॉ. कुंदन फेगडे यांच्यासह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
