भुसावळातील भोळे महाविद्यालयात सायन्स असोसिएशनचे उद्घाटन
Science Association inaugurated at Bhole College, Bhusawal भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : विज्ञान शिकत असताना विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवण्यासाठी प्रात्यक्षिके महत्वाची भूमिका बजावतात, असे मत प्राचार्य डॉ.आरबी.वाघुळदे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सायन्स असोसिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
काार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलचे सदस्य तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य, प्राचार्य फोरमचे उपाध्यक्ष आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते.





आकलन शक्ती वाढवण्यासाठी प्रात्यक्षिके महत्वाची : प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे
प्राचार्य वाघुळदे यांनी दैनंदिन जीवनात जगत असताना विज्ञान कशा पद्धतीने मानवी समाजाला उपयोगी ठरते याचे दाखले देत असताना प्राचीन भारतीय संस्कृती मधील काही उदाहरणे देत त्यांचा आजच्या प्रगतीशी असलेला संबंध स्पष्ट केला. सजग विद्यार्थी माहितीचा उपयोग करून घेत, विज्ञानातील संकल्पनांना जोडत नाविन्यपूर्ण संशोधन जगासमोर कसे आणू शकतात याची काही उदाहरणे त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
विज्ञान शिक्षणात अग्रेसर व्हा : प्राचार्य फालक
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विज्ञानातील संकल्पनांचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा याचे अनेक दाखले देऊन या महाविद्यालयात सुरू असणार्या नाविन्यपूर्ण विज्ञान संशोधनाची माहिती दिली. विज्ञान शाखेतील प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीचा लाभ घेऊन विज्ञान शिक्षणात अग्रेसर व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे चेअरमन प्रा.संजय चौधरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्ीवतेसाठी महाविद्याच्या सायन्स असोसिएशनचे चेअरमन प्रा.संजय चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.एस.एस. पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा. डॉ.दयाघन राणे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर यांच्यासह विज्ञान शाखेसह इतरही विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
