भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात सेवा पखवाडानिमित्त विविध स्पर्धा


Various competitions on the occasion of Seva Pakhwada at P.K. Kotecha Mahila College, Bhusawal भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात सेवा पखवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबदरम्यान आयोजित करण्यात आला.

माय भारत पोर्टलवर विद्यार्थिनींची नोंदणी कार्यक्रम अंतर्गत इंग्रजी विभागाचे प्रा.किरण थेटे यांनी विद्यार्थिनींना माय भारत पोर्टलची माहिती दिली. उपस्थित विद्यार्थिनींचे रजिस्ट्रेशन माय भारत पोर्टलवर करून घेतले.


एड्स जनजागृती अभियान अंतर्गत वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.ज्योती गुरव यांचे व्याख्यान झाले. प्लास्टिक कचरा निर्मूलन अंतर्गत् बेस्ट फ्रॉम वेस्ट अंतर्गत विद्यार्थिनींनी प्लास्टिकच्या अनुपयोगी बॉटल्स इत्यादी वस्तूंचा योग्य पद्धत्तीने पुनर्वापर करून विविध वस्तू बनविल्या व त्यांचे प्रदर्शन भरविले.

विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे विषय ‘सोशल मीडियाचे मानवी जीवनावरील परिणाम’ आणि ‘महिला सबलीकरण व त्यांचे सामाजिक योगदान’ असे होते. ईतिहास विभागाच्या प्रा.दीपाली पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या गड किल्ले व हिंदवी स्वराज्यासाठी त्यांचे योगदान या विषयावर विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली. सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

यशस्वीतेसाठी रासेयो प्रमुख डॉ. मीना चौधरी, प्रा.संदीप नेतनराव व प्रा.निलेश गुरचळ यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !