भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षकांचा सन्मान
Teachers honored at The World School in Bhusawal भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष निशीकांत कोलते व संचालक व सी.ए रोहित कोलते, शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या शैक्षणिक अनुभवांना उजाळा दिला. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते.





