भुसावळात बालवैज्ञानिकांचा विज्ञान प्रदर्शनात आविष्कार : शंभराहून अधिक उपकरणांचे सादरीकरण

एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कला हस्तकला व विज्ञान प्रदर्शन : स्व.बाबासाहेबांच्या 45 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


Child scientists showcase their inventions at science exhibition in Bhusawal: More than a hundred devices presented भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये स्व.बाबासाहेबांच्या 45 व्या पुण्यतिथीनिमित्त कला, हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बालवैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनात शंभराहून अधिक थक्क करणार्‍या उपकरणांचे सादरीकरण करून पालकांची दाद मिळवली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईट सेंकेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सभासद भाग्येश मकरंद नारखेडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे होत्या. मान्यवरांनी दीपप्रज्वलन व मार्ल्यापण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.


विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. प्री प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी यमक व रंगसंगती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मास्क बनवणे, ग्रीटिंग कार्ड, टाकाऊ पदार्थातून सर्वोत्तम सॅलड, मेहंदी, रांगोळी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक दीपक तायडे व अतुल मालखेडे होते.

सायन्स प्रोजेक्टचे परीक्षक गायत्री सरोदे व अविनाश मोरे होते. विद्यार्थ्यांनी रंगोलीच्या माध्यमातून विविध संदेश दिले तर टाकावू वस्तूंपासून टीकावू वस्तू किती चांगल्या प्रकारे तयार करुन त्याचा उपयोग कसा करता येतो हे विद्यार्थ्यांनी दाखवले.

सायन्स प्रोजेक्टमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध उर्जेची रुपे, पावसाचे पाणी साठवण, स्वयंचलित रस्त्यावरील दिवे, पवनचक्की प्रयोग, कचर्‍यापासून वीज निर्मिती, हायड्रोजन पॉवर प्लांट, पूर सूचक प्रणाली, सोलर एनर्जी, भुकंप मापक यंत्र, घर सुरक्षा यंत्र, आत्महत्येविरोधी फॅन रॉड शोध, वाहन चालवतांना झोप लागल्यास वाजणारा अलार्म, होलोग्राम मॉडेल, द़ृष्टीहिन लोकांसाठी उपयोगात येणारा चष्मा आदी विविध प्रकारची शंभराहून अधिक उपकरणे सादर करण्यात आली. एक हजाराहून अधिक पालकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

सदरील कार्यक्रमांस संस्थेचे अध्यक्ष. डॉ. मकरंद एन. नारखेडे, उपाध्यक्ष डॉ. किशोर एन. नारखेडे , चेअरमन मा. श्रीनिवास एन नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही. पाटील, कार्यकारी सभासद डॉ.संजीव एन नारखेडे, भाग्येश मकरंद नारखेडे, राज किशोर नारखेडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचलन मिस शबनत तडवी यांनी केले.एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल मधील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !