भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राज्यस्तरीय स्मृती स्पर्धांचे थाटात उद्घाटन
भुसावळ (21 सप्टेंबर 2025) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संचलित के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक थोर साहित्यिक, शिक्षणमहर्षी स्वर्गीय बाबासाहेब के. नारखेडे यांच्या 45 व्या पुण्यतिथिनिमित्त राज्यस्तरीय निबंधलेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त वक्तृत्व व सुगम संगीत तसेच शिक्षकांसाठी कथा, काव्य लेखन, लेखकांसाठी कथासंग्रह,काव्यसंग्रह व कादंबरीलेखन इत्यादी राज्यपुरस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाघन रविवार, 21 रोजी सकाळी आठ वाजता संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक संदीपजी बिंद्रा प्रमुख अतिथी होते.
यांची होती उपस्थती
राज्यस्तरीय स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन प्रा.नीलिमा वसंत वारके (असोशिएट प्रोफेसर व्ही. ई. एस. इन्स्टिट्यूट, चेंबूर) यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे सभासद भाग्येश मकरंद नारखेडे, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, संस्था सभासद पी.ई. नेमाडे उपस्थित होते.

बालवैज्ञानिक स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते तर हस्तकला स्पर्धेचे उद्घाटन पी.व्ही.पाटील यांच्याहस्ते तसेच आय.टी.सॉफ्ट फ्यूजन स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक संदीप बिंद्रा यांच्याहस्ते व इलेक्टस व्हिजन स्पर्धेचे उद्घाटन संस्था सभासद भाग्येश नारखेडे यांच्याहस्ते करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन. नारखेडे, सदस्य डॉ.संजीव नारखेडे यांनी कार्यक्रमाला भ्रमणध्वनीद्वारे आपला शुभेच्छा दिल्या
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल उपस्थित होत्या. पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, संगणक विभाग प्रमुख बी. ए.पाटील व संगणक विभागसहित विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.
प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख एन.एस. पाटील यांनी केले. उपस्पर्धा प्रमुख मनोज तडवी यांनी स्पर्धकांना सूचना दिल्या. प्रमुख अतिथी संदीप बिंद्रा यांचा प्रेरणादायी परिचय स.डी वासकर यांनी तर प्रमुख उद्घाटक नीलिमा वसंत वारके यांचा परिचय एन.के.बाविस्कर यांनी करून दिला. परीक्षक सत्कार यादी वाचन एस.एस.तळेले यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी पाटील तर आभार विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी मानले.




