भुसावळातील एन.के.नारखेडे सायन्स क्लीझमध्ये एन.के.नारखेडे व पोदार स्कूलचा डंका
N.K. Narkhede and Podar School clash in N.K. Narkhede Science Clearing in Bhusawal भुसावळ (22 सप्टेंबर 2025) : शहरातील शारदा नगरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रविवारी बाबासाहेबांची 45व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त सायन्स क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम क्रमांक एन.के.नारखेडे स्कूल व पोदार स्कूलच्या संघाला विभागून देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे होते. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू पुरुषोत्तम नेमाडे, डॉ.प्रकाश महानवर, संदीप बिंद्रा, सेकेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईट सॅकेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सभासद भाग्येश नारखेडे, शाळेच्या
मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.शाळेच्या शिक्षिका रुपाली चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

जीवनात शिस्त महत्वाची
वकिल पुरुषोत्तम नेमाडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जीवनात नम्रता, शिस्त, ईमानदारी या गोष्टी महत्वाच्या असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी स्थळ वेळ निश्चीत करण्यासह वरिष्ठांचा आदर करावा, असे आवाहन केले. यावेळी सायन्स क्विझसह रांगोळी, सलाद, मास्क, ग्रिटींग, मेहंदी, क्राप्ट सायन्स एक्झीबिशन स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
असा आहे स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक पोदार इंटरनॅशनल स्कुल व एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलला विभागून देण्यात आला तर द्वितीय द वर्ल्ड स्कुल तसेच के.नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सूत्रसंचालन गजाला वासीत व धनश्री महाजन यांनी केले व रुही बासीत यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




