भुसावळात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद


Spontaneous response to taluka-level wrestling competitions in Bhusawal भुसावळ (24 सप्टेंबर 2025) :  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ तसेच एम.आय.पी.एल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने हाजी इकबाल पैलवान आखाडा येथे मुला-मुलींच्या 14, 17 व 19 वर्षातील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धां उत्साहात झाल्या.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन भुसावळ तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी एम.आय.तेली इंग्लिश स्कूलचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना तेली, तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष नामदेव पैलवान, सचिव निकम पहेलवान, हाजी नईम पहेलवान, रईस पहेलवान, जमील पहेलवान, हकीम पहेलवान, कमाल ठेकेदार, अयुब लाला, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, आयुब लाला , सुनील चौधरी, आनंद पाठक यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यांनी मिळवले यश
प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले. स्पर्धेत 14 वर्षातील मुले 35 किलो वजन गट प्रथम- तिलक गवळे, 38 किलो वजन गट प्रथम- हनान अझहर शेख, 41 किलो वजन गट प्रथम- नागेश्वर माळी, 44 किलो वजन गट प्रथम- सोनी मनोज दर्शीत, 48 किलो वजन गट प्रथम- तेजस बोरोले, 52 किलो वजन गट लोकेश बंकर, 57 किलो वजन गट प्रथम- तेजस पवार

17 वर्षातील मुलांच्या कुस्ती स्पर्धेत 41 किलो वजन गटात प्रथम- तेजस सपकाळे, 48 किलो वजन गट प्रथम- अशफाक परवेज, 51 किलो वजन गटात प्रथम- वैभव माळी, 55 किलो गटात प्रथम- आदित्य सपकाळ, साठ किलो वजन गटात प्रथम शेख साजीद जावेद बागवान, 65 किलो वजन गटात प्रथम मोहमज्या रफिक शेख, 80 किलो वजन गटात प्रथम- शेख भाईजान रोशन तांबोळी, 92 किलो वजन गटात प्रथम रिजवान खान सलाउद्दीन, 110 किलो वजन गटात प्रथम अबुझर बागवान,

19 वर्षातील फ्री स्टाईल प्रकारात 57 किलो वजन गटात प्रथम फिरोज खान, 61 किलो वजन गटात नफीस खान, 65 किलो वजन गटात प्रथम विजय गोसावी, 70 किलो वजन गटात दीपक चव्हाण प्रथम, 79 किलो वयोगटात भावेश चौधरी प्रथम , 92 किलो वजन गटात अंजुम परवेज प्रथम, 17 वर्षातील ग्रीक रोमन प्रकारात 41 किलो वजन गटात 41 ते 45 रोशन तडवी प्रथम, 48 किलो गटात प्रसाद पाटील प्रथम, 55 किलो वजनी गटात वीर जयस्वाल प्रथम, 65 किलो वजन गटात कृष्णा नागरे प्रथम, 71 किलो वजनी गटात दर्शन पवार प्रथम, 80 किलो गटात धैर्यत जितेंद्र देवकर प्रथम, 92 किलो वजनी गटात आदेश मोगल प्रथम.

पंच म्हणून दिलीप संगेले, प्रशांत निकम, रईस पैहेलवान, आनंद पाठक,आयुब सर, मुकेश मोरे, आदींनी काम पाहिले. आभार सुनील चौधरी यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !