आई-वडील खरे हितचिंतक : स्वप्नांचा पाठलाग करून ध्येय गाठा ः भुसावळात प्राचार्य आर.पी.फालक


Parents are true well-wishers : Chase your dreams and achieve your goals : Principal R.P. Falak of Bhusawal भुसावळ (25 सप्टेंबर 2025) : विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन जीवनात आपल्या करिअरबद्दल चांगले स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनत करावी व मोबाईलचा वापर आपल्या गरजेनुसार करावा कारण महाविद्यालयीरन शिक्षण हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. शिक्षण घेत असताना आई-वडिलांच्या मतांचा आदर ठेवा कारण तेच खरे हितचिंतक आहेत, असे मत प्राचार्य आर.पी.फालक यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे दा.दे.ना.भोळे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ‘महिला अत्याचार व लैंगिक छळश या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.

मुलींसाठी शिक्षणाच्या तरतुदींची दिली माहिती
जळगाव महिला व बालकल्याण विभागाचे कृणाल शुक्ला यांनी आपल्या मनोगतातून अनाथ असलेल्या मुलींसाठी शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत काय तरतुदी आहे त्याबद्दल माहिती दिली.


विधी सल्लागार सखी वन स्टॉप सेंटरच्या अ‍ॅड.राजश्री पाटील यांनी महिलांना जन्माचे वेळेपासूनच कशी कायद्याची गरज भासते याबाबत इत्यंभूत माहिती दिली. जसे भ्रूणहत्या कायदा, बालविवाह कायदा, कौटुंबिक छळ कायदा कामाच्या ठिकाणी महिलांचा मुलींचा विनयभंग कायदा याबद्दल माहिती दिली.

सखी वन स्टॉप सेंटर जळगावच्या समुपदेशिका चित्रा पाटील
यांनी यांच्या मनोगतातून त्यांच्या केंद्राकडून कोणकोणत्या सुविधा महिलांसाठी उपलब्ध आहे तसेच त्या मिळवण्यासाठी तुमचे सोयीचे मार्ग कसे याबद्दल माहिती दिली

यांची होती उपस्थिती
भोळे महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण/विशाखा समिती सचिव प्रा.डॉ.जयश्री सरोदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ.माधुरी पाटील, श्रेया चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.भोळे, प्रा.गायत्री, प्रा.जागृती, प्रा.भाटे आदींनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !