भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात एआय फॉर बिझनेसवर कार्यशाळा
Workshop on AI for Business at Nahata College, Bhusawal भुसावळ (25 सप्टेंबर 2025) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ‘एआय फॉर बिजनेस’ विषयावर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2025 दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळा झाली. आज सर्वच व्यवसायामध्ये एआयचा वापर होत असून एआय व्यवसाय प्रगतीकरणासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याविषयी विविध ज्ञानवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शन सुमारे 200 सहभागी विद्यार्थ्यांना प्राप्त झाले.
यांची होती उपस्थिती
महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच.बर्हाटे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ.गौरी पाटील, समन्वयक डॉ.स्वाती फालक, एमसीए समन्वयक प्रा.हर्षल पाटील, पूनम महाजन उपस्थित होत्या

द्वितीय सत्रामध्ये डॉ गौरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना इन्ट्राडक्शन टू एआय या विषयावर मार्गदर्शन केले.
वर्कशॉपच्या दुसर्या दिवशी डॉ.जी.आर.वाणी यांनी ‘बेसिक ऑफ मशीन लर्निंग’ या विषयावर विद्यार्थ्यांना समुपदेशित केले.
शेवटच्या दिवशी प्रथम सत्रामध्ये प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.एच. बर्हाटे यांनी ‘इथिकल कन्सीडरेशन ईन एआय’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रामध्ये प्रा.पूनम महाजन यांनी ‘एआय अॅप्लीकेशन्स ईन बिझनेस’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.एच.बर्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली वर्कशॉपचा समारोप करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि ही कार्यशाळा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उपयोगी होईल असे नमूद केले. वर्कशॉप साठी विभागातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




