सुगम संगीत स्पर्धेत भुसावळातील दिव्या शिवरामे प्रथम
Divya Shivarame from Bhusawal wins first in Sugam Sangeet competition भुसावळ (25 सप्टेंबर 2025) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळ आयोजित राज्यस्तरीय स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृतीदिनानिमित्त आयोजित स्पर्धेत भुसावळातलील दिव्या सुदाम शिवरामे हिने सुगम संगीत स्पर्धेत गट क्रमांक दोनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल तिचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंग राजे पाटील, धरणगाव तालुका युवा शिवसेना उपाध्यक्ष महेश पाटील बोरखेडेकर, प्रमोद पाटील आदींनी सत्कार केला.





