इनरव्हील रेल सिटीने वीट भट्टी कामगारांच्या मुलींचे केले ‘कुमारी का पूजन’
Innerwheel Rail City performed ‘Kumari Ka Pujan’ for the daughters of brick kiln workers भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : शहरातील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे दत्तक घेतलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक दोनमधील कुमारीकांचे विधीवत पूजन करण्यात आले.
या शाळेत सर्व वीट भट्टी कामगारांची मुले शिक्षण घेतात. तेथील सर्व मुलींना आणि मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. सुरुवातीला तेथील मुलींचे पूजन करण्यात आले आणि त्यांना फ्रॉक, सफरचंद, राजगिर्याचे लाडू, चिप्स, शृंगार आणि हेअर पीन सप्रेम भेट देण्यात आली. सर्व मुलं-मुली आणि शिक्षकांना क्लबतर्फे अल्पोपहार देण्यात आला.





या कार्यक्रमासाठी क्लबचे सदस्य मोना भंगाळे, मीनाक्षी धांडे, कविता पाचपांडे, सुनीता पाचपांडे, किरण पोलडीया, संध्या वराडे, अनिता महाजन, विनीता नेवे तसेच अध्यक्ष सीमा सोनार व सचिव योगिता वायकोळे यांनी प्रायोजकत्व स्वीकारून मेहनत घेतली. सर्व क्लब सदस्यांनी मदत केल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे चेहरे प्रफुल्लित झाले. त्यांना रोज शाळेत येण्याची आवड निर्माण होईल, असे मत शाळेचे शिक्षक नरेंद्र कोळी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
