राष्ट्र सेवा हीच खरी सेवा : प्राचार्य डॉ रमेश जोशी


Serving the nation is the true service : Principal Dr. Ramesh Joshiभुसावळ (27 सप्टेंबर 2025) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वयंसेवकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व एनएसएस गीत स्वयंसेवकांनी प्रस्तुत केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी होते.

रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा व डॉ.विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. डॉ.सुधीर शर्मा यांनी एनएसएसच्या माध्यमातून वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमाविषयी माहिती देताना वृक्षारोपण, ब्लड डोनेशन, पानपोई सेवा, स्वच्छता अभियान तसेच शीतकालीन शिबिराविषयी माहिती सांगितली.


देशसेवेसारखे पुण्यकार्य दुसरे नाही : प्राचार्य डॉ.रमेश जोशी
महाविद्यालयीन प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा चांगला मंच आहे. व्यक्तित्व विकास व राष्ट्र सेवा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सेवा ही अनमोल असते. चांगल्या संस्काराची पिढी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत असते. देशसेवा यासारखे दुसरे अन्य पुण्यकारक कार्य नाही, असे विचार डॉ.जोशी यांनी व्यक्त केले.

डॉ. विवेक जोशी यांनी माय भारत पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून घेतले .. यावेळी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रमही घेण्यात आला. डॉ.विवेक जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सर्व विद्यार्थ्यांना व स्वयंसेवकांना एनएसएसमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !