‘भारत को जानो’ प्रतियोगितेत द वर्ल्ड स्कूलचा संघ तृतीय


The World School team came third in the ‘Know India’ competition भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : भारत विकास परिषदेतर्फे ‘भारत को जानो प्रतियोगिता’ नुकतीच घेण्यात आली. त्यात भुसावळातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.

इयत्ता सातवीचा विद्यार्थी मुसब शेख व इयत्ता आठवीचा विद्यार्थी सानिध्य श्रीवास्तव यांनी सहभाग नोंदवत यश मिळवले. या यशाबद्दल शाळेचे संचालक सी.ए. रोहित कोलते, शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील शिक्षिका प्रियंका भोळे मॅडम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !