यावल-चोपडा रस्त्यावर चालत्या दुचाकीवर वृक्ष कोसळले : तिघे जखमी
Tree falls on moving bike on Yaval-Chopda road: Three injured यावल (29 सप्टेंबर 2025) : शहराबाहेरील अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा रोडवर महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे चालत्या दोन दुचाकींवर अचानक वृक्ष कोसळून पडले. या अपघातात तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने प्राणहानी टळली.
काय घडले वाहन धारकांसोबत ?
शहरातून मार्गस्थ होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर चोपडा रोडावर दुचाकीद्वारे मनुदेवी येथे दर्शनासाठी योगेश महादेव धुपे (35 रा.सानोेळा, ता.संग्रामपूर, जि.जळगाव जामोद) हे जात होते तर दुसर्या एका दुचाकीवर दीपक भुरू जमरे (23) व सीमा भुरू जमरे (18, रा.शिरवेल महादेव, मध्यप्रदेश) हे जात असताना रविवारी सायंकाळी अचानक चालत्या या दोन्ही दुचाकींवर झाड कोसळले. यामध्ये हे तिघे जखमी झाले.





जखमींना शेख याकुब, शेख खालीद, अजहर शेख, सकलैन शेख आदींनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, अधिपरिचारिका माधुरी ठोके, विजय शिंदे आदींनी त्यांच्यावर उपचार केले. तिघांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या अघातात तिघांचे प्राण थोडक्यात वाचले आहे मात्र, तिघांना जबर दुखापत झाली.
