भुसावळातील सुवर्णकार समाज कार्यक्रमात माधुरी विसपुते ठरल्या ‘होम मिनिस्टर’
विविध स्पर्धांमध्ये सखींनी उडवली धमाल विजेत्यांना आकर्षक पारितोषिके
Madhuri Vispute becomes ‘Home Minister’ at Suvarnakar Samaj program in Bhusawal भुसावळ (29 सप्टेंबर 2025) ‘चूल आणि मुल’ या रहाटगाड्यात अडकलेल्या सखीला स्वतःसाठी वेळ देता यावा, सखींसोबत सुख-दुखःच्या गोष्टी करता याव्यात व या माध्यमातून मनोरंजन होवून विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी भुसावळातील नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे समाजातील महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे रविवार, 28 रोजी शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये सखींनी धमाल केली. सर्वच स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक मिळवणार्या माधुरी विसपुते यांचा पैठणी देवून मान्यवरांनी गौरव केला.
यांची विचार मंचावर उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. माता सरस्वती व संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवअहिर सुवर्णकार समाज मंडळाचे अध्यक्ष गणेशशेठ सोनार, उपाध्यक्ष मोहनशेठ सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्रशेठ सोनार, महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सोनवणे अतिथी होत्या. समाजाला संघटीत होण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असून महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
दरम्यान, स्पर्धेत पैठणी जिंकण्याचा मान व प्रथम क्रमांक माधुरी सुधीर विसपुते तर द्वितीय क्रमांक पल्लवी तुषार जाधव व तृतीय क्रमांक संगीता राजदीप अहिराव यांनी पटकावला. सूत्रसंचालन प्रवीण मोरे तर प्रास्ताविक प्रा.डॉ.श्यामकुमार दुसाने यांनी केले. आभार मोहन सोनवणे यांनी मानले. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण घोडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पारोळेकर, कमलेश निकुंभ, प्रा.डॉ.श्याम कुमार दुसाने, संजय सोनार, प्रवीण मोरे, सुनील सोनगिरे, विश्वनाथ सोनार, प्रकाश विसपुते, हिमांशू दुसाने, संतोष सोनार, अनिलदत्त सोनार आदींनी परिश्रम घेतले.




