भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात युवतींची रक्त तपासणी
Blood test of young women at De.N.A. Bhole College in Bhusawal भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, 26 रोजी न.पा.दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नृपाली सावकारे यांनी युवतींच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले.
जंक फूड आरोग्यासाठी घातकच
डॉ.सावकारे यांनी युवतींचा आहार ,व्यायाम, झोप या त्रीसुत्रीचा योग्य समतोल राखून आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहन केले. युवतींनी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा तसेच नियमित व्यायाम करावा, पुरेशी झोप घ्यावी, मानसिक आरोग्यासाठी ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा ध्यान व मेडीटेशन करावे, कुटूंबासोबत चांगले संबंध राखावे, जंक फूडचा आहारातील समावेशाचे दुष्परीणाम काय आहेत यावर मार्गदर्शन केले.

महाविद्यालयात युवतींच्या एच.बी.व लिपीड प्रोफाईल रक्ततपासणीसाठी कॅम्प लावण्यात आला. त्यात महाविद्यालयातील पन्नास युवतींची तपासणी करण्यात आली. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी युवतींनी आपले आरोग्य ही सर्वात महत्वाची संपत्ती आहे व ती जपणे किती आवश्यक आहे त्यासाठी युवतींनी जागरूक रहावे याबाबत आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तर आभार प्रा.डॉ.जे.पी.सरोदे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, समिती सदस्य डॉ.अंजली पाटील, प्रा.एस.एन.चौधरी, एन.एस.वानखेडे उपस्थित होते.




