भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात वैद्यकिय तपासणी शिबिर
Medical check-up camp at De.N.Bhole College, Bhusawal भुसावळ (1 ऑक्टोंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 वैद्यकिय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग मार्गदर्शक तत्वानुसार कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
यावेळी विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेण्यात आली. त्यात रक्त भिसरण संस्था, श्वसन संस्था, त्वचा, पोट, कान, नाक घसा, डोळे, दंतविकार आदी तपासण्या करून विद्यार्थ्यांचे विविध आजारांशी संबधित सर्व शंकांचे निरसन केले व उपाय सांगितले,





आरोग्य शिबिरासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्या अध्यक्षतेखाली तपासणीसाठी शहरातील डॉ.दीपक जावळे, त्वचा रोग तज्ज्ञ डॉ.रेशमा जावळे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.धैर्यसागर राणे, गरेडिओलॉजिस्ट डॉ. धैर्यसागर राणे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी 216 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
शिबिरासाठी वैद्यकीय समिती प्रमुख प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.जे.पी.सरोदे, प्रा.डॉ.ए.आर.सावळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ..जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.एन.एस.वानखेडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.धनश्री महाजन, दीपक महाजन, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, सुधाकर, चौधरी, प्रमोद नारखेडे यांनी परिश्रम घेतले.
