जळगाव हादरले : जुन्या वादातून तरुणाला संपवले


Jalgaon shaken : Young man killed over old dispute जळगाव (3 ऑक्टोबर 2025) : शहरातील गुन्हेगारांनी डोके वर काढले असून जुन्या वादातून पुन्हा तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जळगावच्या कासमवाडी परिसरात शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (27, रा.कासमवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खुनाने हादरले शहर
जळगावच्या कासमवाडी परिसरात राहणार्‍या ज्ञानेश्वर उर्फ नानाचा घरासमोर राहणार्‍या काही तरुणांशी जुना वाद होता. शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजता कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना त्याच्या घरासमोर राहणार्‍या दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना हा गंभीर जखमी झाला.

घटनेत नाना उर्फ ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला मित्रांनी तातडीने दुचाकी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना तासाभरात त्याचा मृत्यू झाला. खुनाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, फौजदार चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !