पोहण्याची इच्छा जीवावर : खदानीत बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू


The desire to swim at the cost of life : Four die tragically after drowning in a quarry वाळूज (3 ऑक्टोबर 2025) : खदानीत उतरलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेजळगावात गुरुवार, 2 ऑक्टोब) घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या एक मामेभावाचा व गावातील अन्य एका मुलाचा समावेश आहे.

इरफान इसाक शेख (17), इम्रान इसाक शेख (13), झैन हयात पठाण (9) आणि व्यंकटेश ऊर्फ गौरव दत्तू तारक (9, सर्व रा. लिंबेजळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

जाहेद रसूल पठाण यांची गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव शिवारात सहा एकर शेतजमीन आहे. याच ठिकाणी त्यांचे दुमजली घर असून त्यांची तीन मुले, मुलगी आणि जावई असे सर्व येथेच राहतात. त्यांच्या शेजारी गट क्रमांक 134 मध्ये दत्तू तारक हे कुटुंबीयांसह राहतात.

गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांचा नातू इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी त्याचा लहान भाऊ इम्रान, मामे भाऊ झैन आणि शेजारील दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश या तिघांसह घराबाहेर पडले होते. जवळच्या गायरान जमिनीत काही लोकांनी मुरूम उपसा करून भला मोठा खड्डा (खदान) केला आहे.

त्या खड्ड्यातच साठलेल्या पाण्यात त्यांनी ट्रॅक्टर धुतले. त्यानंतर इम्रान, झैन व व्यंकटेश हे तिघेजण पोहण्यासाठी या पाण्यात उतरले होते. तिघेही पाण्यात बुडू लागताच इरफाननेही त्यांना वाचण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तिघांसह तोही पाण्यात बुडाला. दीड-दोन तास झाले तरी मुले परत आली नाहीत.

इरफान शेख हा वडील आणि मामांना शेतीत सहकार्य करतो. लहान भाऊ इम्रान हा जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकतो. लहान झैन हा शनी मंदिराजवळ असलेल्या भवानी वस्ती या शाळेत इयत्ता चौथीत, तर व्यंकटेश ऊर्फ गौरव हा जिल्हा परिषद शाळेत चौथीत आहे. गुरुवारी दसरा असल्याने शाळेला सुटी होती. त्यामुळे हे सर्वजण इरफानसोबत ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले होते. तेथे पोहण्याची इच्छा सर्वांच्या जिवावर बेतली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !