जळगावातील तरुणाचा भुसावळच्या नदीपात्रात बुडून मृत्यू


A young man from Jalgaon drowned in a riverbed in Bhusawal and died भुसावळ (7 ऑक्टोबर 2025) : भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात देवी विसर्जनासाठी आलेल्या जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना 4 रोजी घडली. गोविंदा कैलास कोळी (21, कुसूंबा, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
कुसूंबा येथील गोविंदा कोळी हा तरुण कुसूंबा येथील देवीच्या विसर्जनासाठी गावातील तरुणांसोबत भुसावळ येथे आला होता मात्र देवी विसर्जनादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात पडून वाहिून गेला. ही घटना 4 रोजी रात्री 11.30 वाजता घडली मात्र रात्री उशिरा त्याचा मृतदेह आढळला नाही मात्र 6 रोजी त्याचा मृतदेह नदीपात्रापासून दोनशे मीटर अंतरावर आढळला. तपास कॉन्स्टेबल लोकेश तडवी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !