दांडी यात्रा हा इतिहासच नाही तर व्यवस्थापनाचा एक मार्ग : नाना पाटील

Dandi Yatra is not just history but a way of management : Nana Patil भुसावळ (7 ऑक्टोबर 2025) : शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालय महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगते व्यक्त केली.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांनी महात्मा गांधींच्या जीवनाविषयी मार्गदर्शन करताना साबरमती ते दांडी हा दांडी मिठाचा सत्याग्रहच नाही तर तो नियोजनाचा धडा, नेतृत्वाचाची शाळा, संघटनेचा आदर्श आणि प्रेरणेचा झरा असल्याचे सांगितले.
1965 ला कोरडा दुष्काळ झाला त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी व त्यांच्या परिवाराने आठवड्यातून एक दिवस उपवास करावा असं जाहीर करून स्वतः व परिवारापासून त्यांनी सुरुवात केली, असेही नाना पाटील म्हणाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी व पर्यवेक्षक संजीव पाटील हे उपस्थित होते. सूत्रसंचालन सरोज कोष्टी तर आभार नयना पाटील यांनी केले.
