यावल पालिकेत होणार चुरशीची निवडणूक : 13 जागांवर महिला निवडून येणार !

Tight elections will be held in Yaval Municipality : Women will be elected to 13 seats! यावल (8 ऑक्टोबर 2024) : यावल पालिकेत नगराध्यक्षांसह 13 जागांवर महिला निवडून येणार आहेत. बुधवार, 8 रोजी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षखाली आरक्षण काढण्यात आले. 11 प्रभागातील 23 पैकी 12 जागांवर आता महिला निवडून येतील.
असे निघाले आरक्षण
नागरिकांच्या मागास प्रवर्ग सहा जागा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी दोन अशा चार जागा तर सर्वसाधारण साठी 13 जागांवर आरक्षण काढण्यात आले. एकूण 23 पैकी 12 जागांवर महिलांचे देखील आरक्षण करण्यात आले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष महिला असल्याने व 12 नगरसेविका महिला आरक्षित केल्याने नगरपालिकेच्या एकूण 24 जागांपैकी 13 ठिकाणी महिलांना संधी मिळाली. यावेळी मुख्याधिकारी निशीकांत गवई, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कार्यालय अधीक्षक विशाल काळे, स्वच्छता निरीक्षक संग्राम शेळके ादींची उपस्थिती होती.
असे निघाले आरक्षण
प्रभाग क्रमांक 1- अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 2- अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 3- नामाप्र महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 4- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 5- नामाप्र व सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 6- नामाप्र महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 7- नामाप्र महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 10- नामाप्र व सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 11- अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला व नामाप्र
