रौप्य शॉट :रायफल शुटींग स्पर्धा प्रियदर्शिनी त्रिपाठीस रौप्य पदक


जळगाव (9 ऑक्टोबर 2025) : गोदावरी इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलची  प्रियदर्शनी त्रिपाठीस रायफल शूटिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवत यश प्राप्त केले आहे. नाशिक येथे शालेय विभागीय स्पर्धेत रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे दिनांक ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रियदर्शनी त्रिपाठी ने १७ वर्षाखालील गटात अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक आपल्या नावे केल्याने शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे या उत्कृष्ट यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील ,हृदय रोग तज्ञ डॉ .वैभव पाटील ,स्कूलच्या प्राचार्या सौ नीलिमा चौधरी,यांनी तसेच, सर्व शिक्षकवर्ग व क्रीडा मयूर पाटील व ममता प्रजापत यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !