जळगाव जिल्ह्यातील 15 पंचायत समितींचे आरक्षण जाहीर : भुसावळसह चोपडा अनुसूचित जमातीसाठी राखीव
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत निघाली आरक्षण सोडत

Reservation of 15 Panchayat Samiti in Jalgaon district announced : Bhusawal and Chopda reserved for Scheduled Tribes जळगाव (9 ऑक्टोबर 2025) : स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे पडघण वाजत असताना जळगाव जिल्यातील पंचायत समिती निवडणुका उंबरठ्यावर असल्याने गुरुवारी 15 तालुक्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. भुसावळसह चोपडा तालुक्यासाठी सभापतीपदाची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाल्याने येथेदेखील आगामी काळात राजकीय समीकरणे बदलतील, असा राजकीय अंदाज आहे.
जळगावचे नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जळगाव जिल्हा नियोजन भवनात 15 तालुक्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. बैठकीस नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.संपूर्ण सोडत प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितरीत्या पार पडली.
भुसावळ नगराध्यक्षांप्रमाणे पंचायत समितीवरही आरक्षण
भुसावळ नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाल्यानंतर भुसावळ पंचायत समितीचेही आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघाल्याने येथेदेखील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चिन्हे आहेत.
दुसरीकडे जामनेर पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला सभापती तर चर्चेत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये महिला असे आरक्षण निघाले आहे.
असे निघालेआरक्षण
पारोळा- अनुसूचित जाती महिला
बोदवड- अनुसूचित जमाती महिला
भुसावळ व चोपडा- अनुसूचित जमाती
अमळनेर व एरंडोल- नागरिकांचा मागास प्रवर्ग
रावेर व मुक्ताईनगर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
चाळीसगावसह जळगाव, जामनेर व धरणगाव- सर्वसाधारण महिला
यावल, पाचोरा व भडगाव- सर्वसाधारण
