यावल शहरातील मनसेचे पदाधिकारी भाजपात


MNS office bearers of Yaval city join BJP यावल (9 ऑक्टोबर 2025) : विद्यार्थी दशेपासून मनसेत काम करत 18 वर्ष निष्ठावान मनसे सैनिक म्हणून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात ओळख असलेले शहरातील रहिवासी मनसे जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला व आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा भालोद येथे रविवारी सांयकाळी पार पडला असुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या भाजपची ताकद वाढतांना दिसत आहे.

18 वर्षानंतर पक्ष बदल
18 वर्षानंतर एक निष्ठेने काम करणारे मनसेचे राज्य उपाध्यक्ष जनहित व विधी विभागचे चेतन अढळकर यांच्या सोबत त्यांच्या प्रभागातील व यावल शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांसह युवकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.

आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वात भालोद येथे एका कार्यक्रमात पक्ष प्रवेश करण्यात आला. आजवर तालुक्यासह जिल्ह्यात व राज्यात मनसेचे चेतन अढळकर यांनी खूप लोकहिताची काम केली आहे व आंदोलने केली होती. 18 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांनी भाजपची वाट धरली आहे व त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत प्रवेश केला आहे. या त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मनसेची या भागातील ताकद जणू पुर्ण पणे संपुष्टातच आल्याचे दिसत आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार अमोल हरिभाऊ जावळे, तालुकाध्यक्ष सागर कोळी, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, उमेश फेगडे, बाळू फेगडे, पुंडलिक बारी, राहुल बारी, भूषण फेगडे, रितेश बारी सह मान्यवरांची उपस्थिती होती.

यांनी केला पक्ष प्रवेश
मनसे जनहित राज्य उपाध्यक्ष अढळकर सह मनसेचे तालुकाध्यक्ष मुकेश बोरसे, उप तालुकाध्यक्ष श्याम पवार, किशोर नन्नवरे, गौरव कोळी, प्रमोद कोलते, गजेंद्र माळी, रोहित सुतार, रघु अढळकर, गोविंदा सुतार, उदय अढळकर, किरण अढळकर, ज्ञानेश्वर देवरे, निलेश देवरे, सुमित लोखंडे, सुरेश अढळकर, शेखर नन्नवरे, छोटू माळी, हितेंद्र माहेश्री, पप्पू अढळकर, नारायण माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्याचा समावेश आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !