विधानसभा निवडणुकीत क्लीप व्हायरलची धमकी : पाचोर्यातील भाजपा नेत्या वैशाली सूर्यवंशींकडून मागितली 30 लाखांची खंडणी

Ransom of Rs 30 lakhs demanded from BJP leader Vaishali Suryavanshi of Pachora पाचोरा (11 चॉक्टोबर 2025) : पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार तथा निर्मल सीड्सच्या संचालिका वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असताना संशयीतांने विविध क्रमांकावरून फोन करून तुम्ही पैसे वाटत आहात, अशी बनावट क्लीप तयार करून ती व्हायरलची धमकी देत तब्बल 30 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे खंडणी प्रकरण ?
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमन नावाच्या व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधत त्याची टीम त्यांच्या निवडणुकीसाठी काम करेल, असे सांगितले होते. त्यानंतर संबंधिताने पुन्हा संपर्क साधून आता आमच्या टीमला विरोधकांचे काम करण्याची वेळ आली असल्याचे सांगून तो सूर्यवंशी यांच्या विरोधात काम करत राहिला.
सप्टेंबर 2025 मध्ये, अमन याने पुन्हा फोन करून सूर्यवंशी यांना धमकी दिली की, जर त्यांनी 30 लाख रुपये दिले नाहीत, तर तो त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या चौकशी यंत्रणांकडे तक्रार करण्याची आणि सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली. यावर वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अमन नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल कुमारपवार करीत आहेत.
