चोरवडजवळ पीकअपच्या धडकेत पातोंड्याचा दुचाकीस्वार ठार


रावेर- अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर मध्यप्रदेशच्या सीमेगतच चोरवड गावाजवळ महेंद्रापीकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने मध्यप्रदेशातील दुचाकीस्वार ठार झाला. शनिवारी दुपारी दिड वाजता हा अपघात झाला. रावेर-बर्‍हाणपूर महामार्गावर चोरवडजवळ शनिवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास बर्‍हाणपूरकडे भरधाव वेगाने भाजीपाला घेवून येणार्‍या पीकअप (एम.एच 15 जी.व्ही.0890) धडक दिल्याने मध्यप्रदेशातील पातोंडा येथील प्रकाश पंडीत महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. महाजन हे रावेर शहरातील नातेवाईकांना भेटून बर्‍हाणपूरकडे जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी 15 फूट हवेत उडाली व नंतर तिचा चक्काचूर झाला. अपघातानंतर रावेर पोलिस ठाण्याचे जितेंद्र जैन, श्रीराम वानखेडे, चालक हर्षल पाटील यांनी धाव मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. महेंद्रा पीकअप गाडी चालक योगेश अंबादास खरात (रा.पिंपळगाव ता.निफाड, जि.नाशिक) याच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली.


कॉपी करू नका.