भुसावळात प्रभाग आठ प्रारूप मतदार यादीत असंख्य चुका : निवडणूक आयोगाकडे तक्रार


Numerous errors in the draft voter list of ward eight in Bhusawal: Complaint to the Election Commission भुसावळ (11 ऑक्टोबर 2025) : नगरपालिका निवडणूक 2025 साठी भुसावळ नगरपालिकातर्फे नवीन प्रभाग क्र. 8 ची प्रारूप मतदार यादी कार्यक्रम राबविताना अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. याबाबतची तक्रार प्रा.धीरज पाटील यांची थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश व सुचनाकडे दुर्लक्ष करून निवडणुकीसारख्या महत्वाच्या कामकाजात गांभीर्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंतिम प्रभाग रचनेत नमूद नसलेल्या गवळी वाडा, सुतार गल्ली, गमाडिया प्रेस, फकिरवाडा न्यु सातारा फाईल, कुटे गल्ली, मामाजी टॉकीज परिसर, महात्मा फुले नगर, हबंडर्डीकर चाळ, हिरकणी शेटचा वाड़ा, जवाहर हाटेल जवळील भाग, इमाम वाडा, बौध्द वाडा परीरातील सुमारे 750 पेक्षा जास्त नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 8 च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रभाग रचना बदललेली नसताना मतदार वाढले कसे ?
शेकडो दुबार नावे असून मृत नावेही समाविष्ट आहेत. बीएलओना सूचना दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही न झाल्याने या प्रभागात साडे दहा हजार मतदार आहेत. 2022 ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यावेळीच्या अंतीम मतदार यादीत व आताच्या प्रारूप यादीत खुप मोठा फरक आहे. या ठिकाणी लोकसंख्या पेक्षा जास्त मतदार झाले आहेत ते आले कुठून ? असा सवाल निर्माण झाला आहे. प्रभाग रचना बदललेली नसताना मतदार वाढले आहेत. काही ठिकाणी नावे दुसर्‍या प्रभागात लावली गेली आहेत. या सगळ्या प्रकारामुळे अनेक मतदार यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात मतदान करता येणार नाही, ते वंचित राहतील, अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !