उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून महिलांची ‘दिवाळी गोड’

भुसावळात पाच ते सात लाखांची उलाढाल : विविध मान्यवरांची भेट


‘Diwali Sweet’ for Women through Entrepreneurs’ Gathering भुसावळ (13 ऑक्टोबर 2024) : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून आयोजित तीन दिवसीय महिला उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला

मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे. प्रतिष्ठा मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार प्रायोजक तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अन्य मान्यवरांनी येथे काढले. शहरातील ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 10 ते 12 दरम्यान उद्योजक मेळावा झाला. तीन दिवसीय मेळाव्यात पाच ते सात लाखांची उलाढाल झाल्याने महिला उद्योजकांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य फुलले.

उपक्रमाचे 13 वे वर्ष
शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे सलग महिला उद्योजक मेळाव्याचे ब्राह्मण संघात आयोजन केले जाते व यंदा उपक्रमाचे 13 वे वर्ष हेाते. या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होते शिवाय महिलांच्या हाताला या काळात रोजगारही उपलब्ध होतो. विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेमुळे महिला उद्योजकांच्या दोन पैशांची बचत होवू शहरासह परिसरातील नागरिक भेट देत असल्याने स्थानिक वस्तूंचे उत्तम प्रकारे मार्केटींग देखील होते.

पाच ते सात लाखांची उलाढाल
यंदाच्या महिला उद्योजक मेळाव्यात दिवाळी सणाला लागणार्‍या विविध वस्तू, दिवाळी पदार्थ तसेच घर सजावटीचे साहित्य हे एकाच छताखाली ब्राह्मण संघात उपलब्ध करून देण्यात आले. 10 ते 12 दरम्यान आयोजित या मेळाव्यात शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी भेट देत मनसोक्त खरेदी केली. सणा-सुदीच्या काळात महिलांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांच्यात स्वावंलबी झाल्याची भावना निर्माण झाले. यंदाच्या मेळाव्यात शहर व तालुक्यातील 108 महिलांनी आपले स्टॉल लावले होते.

उपक्रमाचे कौतुक करावे तेव्हढे कमी : मंत्री सावकारे
मंत्री सावकारे म्हणाले की, पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी अपनाओचा नारा दिला असून या माध्यमातून देशातील चलन देशातच राहण्यास मदत होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून हा उद्देश सफल झाल्याचे सांगून त्यांनी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उपक्रमाचे यावेळी तोंड भरून कौतुक केले. सेवाभावी वृत्तीने राबवण्यात येणारा उद्योजक मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून महिलांची दिवाळी गोड झाल्याचे ते म्हणाले.

या मान्यवरांनी दिल्या भेटी
तीन दिवसीय मेळाव्यात मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, बियाणी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, भुसावळ बाजारपेठ पोलिस उपनिरीक्षक भारती काळे आदींनी भेट दिली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी आभार मानले.

उद्योजक मेळावा यशस्वीतेसाठी रजनी सावकारे यांच्यासह अनिता आंबेकर, सोनल महाजन, वैशाली सैतवाल, श्रद्धा चौधरी, राजश्री बादशाह, राजेश्री देशमुख, जयश्री चौधरी आदींनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !