यावल तहसीलमध्ये अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गात येणार्‍या शेती क्षेत्राच्या हरकतींवर सुनावणी


यावल (14 ऑक्टोबर 2025) : यावल तहसील कार्यालयामध्ये सोमवारी प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंकलेश्वर बर्‍हाणपुर प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गात येणार्‍या शेती क्षेत्र संर्दभात सुनावणी घेण्यात आली. तालुक्यातील 17 गावातील 140 शेतकर्‍यांच्या हरकतींवर येथे सुनावणी झाली. यात शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. आर्थिक मोबदला आणि शेतकर्‍यांच्या अडीअडचणी संदर्भात शेतकर्‍यांकडून हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.

यावल तालुक्यातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग मार्गस्त होत आहे. या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गात तालुक्यातून विविध गावातून बायपास प्रस्तावित आहे. तर यावल शहरातून देखील हा महामार्ग शहराच्या बाहेरून जाणार आहे. तालुक्यातील 17 गावातील शेतकर्‍यांच्या शेती क्षेत्र या राष्ट्रीय महामार्गात जात आहे. तेव्हा या गावातील 140 शेतकर्‍यांनी प्रांत अधिकार्‍यांकडे हरकती नोंदवल्या होत्या. तेव्हा या हरकतीची सुनावणी सोमवारी यावल तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आली.






यांच्या उपस्थितीत सुनावणी
या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी. एम. पवार, नायब तहसीलदार जगदीश गुरव, तसेच माहामार्गाचे प्रोजेक्ट साईट इंजिनियर चंदन गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावण्या सुरू झाल्या. काही शेतकर्‍यांनी वकिलांच्या माध्यमातून तर काही शेतकरी स्वतःच युक्तिवाद करताना या ठिकाणी दिसून आले. या ठिकाणी सुनावणी पूर्ण झाली असून लवकर या संदर्भातील निकाल दिला जाणार आहे. सुनावणीसाठी मोठ्या संख्येत शेतकरी तहसील करण्यात आल्याने येथे खूप गर्दी झाली होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !