वाचनामुळे मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो : प्राचार्य डॉ.रमेश जोशी


Reading leads to all-round development of a person:  Principal Dr. Ramesh Joshi भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात मंगळवार, 15 ऑक्टोबर हा दिवस डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रमेश जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, डॉ. अब्दुल कलाम हे पुस्तक प्रेमी होते. अत्यंत सामान्य परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्यांना देशाचे राष्ट्रपती पद दिले गेले. त्यांनी आपल्या जीवनात विद्यार्थ्यांना अधिक महत्व दिले. आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे व आपली वाचन क्षमता वाढवावी.






कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुस्तकाचे वाचन केले. प्रसंगी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !