सुकळीत ‘पंचायत राज अभियानातर्गत’ वनराई बंधार्याची निर्मिती !
Construction of a forest dam under the ‘Panchayat Raj Mission’ in Sukli! मुक्ताईनगर (15 ऑक्टोबर 2025) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातर्गत तालुक्यातील सुकळी येथे ग्रामपंचायत अधिकारी गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधार्याची निर्मिती करण्यात आली.
जलपातळी वाढण्यास मदत
जंगलातून वाहत येणार्या ओढ्यावर अगदी गावाशेजारी या ओढ्यावर सिमेंटच्या खाली गोण्यात वाळू भरुन गोण्या भींतीसारख्या रचण्यात आल्या. परीसरातील पावसाळ्यातील वाहत जाणारे पाणी अडवुन जमिनीत जिरवले जाते.





अशा बंधार्यांमुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास हातभार लागतो. ग्रामस्थांनी जेथे शक्य होईल तेथे अशा पद्धतीने वनराई बंधार्यांची स्वतः श्रमदाने उभारणी करावी. यासह जलसंवर्धनाचे महत्व पटवुन देत संवर्धन व जतन याविषयी माहिती ग्रामविकास अधिकारी गोविंद राठोड यांनी उपस्थितांना दिली.
गावातील प्रत्येक पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचा शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सुकळी ग्रामपंचायतीस पदभार स्वीकारलेले प्रशासकीय अधिकारी गोविंद राठोड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत यापूर्वीच वृक्ष लागवडीचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. स्वच्छतेबाबतची अनेक विकासकामे केली. सुटीच्या दिवशी पण गावात हजर राहुन लोकांच्या समस्येनुसार ग्रामनिधी खर्च केला. यामुळे ते अल्पावधीतच गावकर्यांना लोकप्रिय झाले. यावेळी सुकळी ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, नंदकुमार नमायते, सदस्या सीमा पाटील, शारदा कोळी, प्रियंका पाटील, ग्रा कर्मचारी रवींद्र कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
