भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात
भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) : शहरातील कोलते फाऊंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी शाळेचे अध्यक्ष निशीकांत कोलते, संचालक व सी.ए.रोहित कोलते, शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांनी शाळेतील विध्यार्थ्यांना, शिक्षकांना पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व इको फ्रेंडली दिवाळी साजरी करावी, प्रदूषण टाळावे आदींबाबत माहिती दिली.





