ऑर्डनन्स फॅक्टरी स्कूलमध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रेरणादिन म्हणून साजरी
Dr. A.P.J. Abdul Kalam’s birth anniversary celebrated as Inspiration Day at Ordnance Factory School भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) : भारताचे माजी राष्ट्रपती व प्रख्यात वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून ऑर्डिनन्स फॅक्टरी हायस्कूल उच्च व्यवसाय माध्यमिक अभ्यासक्रम, वरणगाव (ता.भुसावळ) येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य एम.व्ही.भोईटे, शिक्षकवृंद तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. कलाम हे 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांना भारतातील क्षेपणास्त्र पुरुष म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विज्ञान आणि सार्वजनिक सेवेसाठी वाहिले. त्यांच्या कार्यातून व विचारांतून आजही तरुणांना प्रेरणा मिळते.





