मुक्ताईनगर पंचायत समितीत आरक्षण सोडत नव्याने निघणार !


Muktai Nagar Panchayat Samiti will start anew, leaving reservations behind! जळगाव (16 ऑक्टोबर 2025) : मुक्ताईनगर पंचायत समिती करीता आरक्षण सोडत काढतांना चुकीची झाल्याने आरक्षण सोडत नव्याने काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

या अनुषंगाने मुक्ताईनगर पंचायत समितीकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.






जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांना या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वेळेत सभास्थळी हजर रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली मात्र ही प्रक्रिया चुकीची ठरल्योन नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !