मुशाळतांड्यात आदिवासी बांधवांना फराळ, मुलांना खेळणींचे वितरण

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा उपक्रम


Distribution of snacks to tribal brothers and toys to children in Mushaltanda भुसावळ (23 ऑक्टोबर 2025) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे मुशाळतांडा येथे आदिवासी बांधवासोबत दिवाळीचा उत्साही आणि आनंदी क्षण साजरा केला. क्लबने गावातील 110 कुटूंबाना दिवाळी फराळ आणि लहान मुलांना खेळणी व फटाके वाटप करून त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलवले.

प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना नवीन खेळणी व फटाके मिळाल्याचा आणि कुटुंबांना पारंपारिक दिवाळीचा फराळ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होता. क्लबचे अध्यक्ष देवेंद्र वाणी आणि सचिव हरमीत सिंग, प्रकल्पाचे प्रमुख सचिन अग्रवाल, सह-प्रमुख विकास भराडे यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.






या प्रोजेक्टला चेतन पाटील, सोनू मांडे, विशाल शहा, आशिष पटेल, अनिकेत पाटील, रणजित खरारे, श्रीकांत जोशी, मिलिंद धर्माधिकारी या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुसाळ तांडा गावाचे पोलीस पाटील रवींद्र पवार,राजू राठोड, गोरेलाल दरबार यांची उपस्थिती होती.

दिवाळी आनंद पसरविण्याचा सण
दिवाळी हा आनंद वाटण्याचा आणि प्रकाश पसरवण्याचा सण आहे. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी नियमितपणे समाजविकास, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवून ‘सेवा हेच प्रथम कर्तव्य’ या रोटरीच्या ध्येयानुसार कार्य करत आहे, असे यावेळी रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष देवेंद्र वाणी यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !