डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत राहणार हतनूरमध्ये पाण्याची आवक

बेमोसमी पाऊस झाल्यास पुन्हा आवक वाढेल


Water inflow in Hatnur will continue till the first fortnight of December भुसावळ (25 ऑक्टोबर 2025) : हतनूर धरण 10 ऑक्टोंबरला शंभर टक्के भरल्यानंतरही आवक कायम आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ही आवक राहिल. सध्या विदर्भासह मध्यप्रदेशातील पाणलोटक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे ही आवक डिसेंबरच्या अखेरपर्यंत टिकण्याची शक्यता हतनूर प्रशासनाने व्यक्त केली आहे. सध्या धरणात दररोज 3 हजार 390 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

10 रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले
हतनूर धरणात 10 ऑक्टोबरला शंभर टक्के जलसाठा करण्यात आला होता. यानंतरच्या काळात धरणात तापी व पूर्णा या दोन्ही नद्यांमधून आवक सुरुच आहे. यामुळे शंभर टक्के जलसाठा करुनही दोन दरवाजे अर्धा मिटरने उघडून तापी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. हतनूर धरणात साधारण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याची आवक कायम राहू शकणार आहे.






अवकाळी पावसामुळे आवक डिसेंबरच्या अखेरपर्यंतही राहू शकेल. यामुळे धरणातून विसर्ग झाल्यानंतरही 100 टक्क्यांवर जलपातळी स्थिर राहिल. यामुळे आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी माहिती उपविभागीय अभियंता एस. जी. चौधरी यांनी दिली.

रब्बीचे चार आवर्तन मिळतील
आगामी काळात कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडले जाईल. उशिरापर्यंत आवक कायम राहिली तर रब्बीसाठी चार आवर्तनदेखील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार देण्याम आली. सध्या जमिनीत ओलावा असल्याने शेतकर्‍यांकडून आवर्तनाची मागणी नाही मात्र आगामी काळात शेतकर्‍यांच्या मागणीनुसार विसर्ग केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !