गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे विभागातून छठ पर्वासाठी धावणार विशेष गाड्या

रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केले नियोजन


Railways to run special trains for Chhath Parva to control crowd भुसावळ (25 ऑक्टोबर 2025) : दिवाळी आणि छठ पर्वाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासात मोठ्या प्रमाणावर प्रवासी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने व्यापक तयारी केली आहे. या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास अनुभव मिळावा यासाठी रेल्वे विभागाने नियोजन केले आहे.

24 तास वार रूम कार्यरत
भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, खंडवा आणि अकोला या प्रमुख स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी, आरपीएफ जवान आणि वाणिज्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर 28 ऑक्टोबर पर्यंत गर्दी राहण्याची शक्यता असल्याने सीसीटीव्हीद्वारे सतत देखरेख, प्लॅटफॉर्म तिकिटांची तात्पुरती विक्री स्थगिती, तसेच 24 तास कार्यरत वॉर रूम सुरू ठेवण्यात आली आहे.






या गाड्यांचा रेल्वे प्रवाशांना दिलासा
प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती-पुणे-अमरावती 01404/01405) ही सण विशेष गाडी 8 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवार धावत आहे. विभागातून चालवल्या जाणार्‍या 1464 विशेष सेवांपैकी आजपर्यंत 544 (272 अप आणि 272 डाउन) गाड्या चालवल्या गेल्या आहेत. 23ऑक्टोबर रोजी एकूण 20 (5 अप आणि 15 डाउन) विशेष गाड्या विभागातून धावत आहेत. या सर्व गाड्या नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला आणि बडनेरा अशा प्रमुख स्थानकांवर थांबतात, अशी माहितीही प्रशासनाने दिली.

गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष उपाय
स्थानकांवर व गाड्यांमध्ये तिकीट तपासणी कडक करण्यात आली आहे.अतिरिक्त आरपीएफ आणि वाणिज्य कर्मचारी तैनात असून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे.

नाशिक रोड आणि मनमाड येथे प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती स्थगित
आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिकारी नेमले गेले आहेत. प्रकाश, पिण्याचे पाणी व सुविधा यांची व्यवस्था विशेषतः नाशिक स्थानकावर करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना गाड्या फक्त नियुक्त प्लॅटफॉर्मवरच घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

भुसावळ विभागाकडून मेमू सेवा
22 आणि 23 ऑक्टोबर रोजी भुसावळ-देवळाली-भुसावळ या मार्गावर विशेष मेमू सेवा चालविण्यात आली असून, सुमारे 2 हजार प्रवाशांनी या सेवांचा लाभ घेतला. रेल्वे चालकांना शिट्टी वापरून सतत सावधानतेचे संदेश देण्यात येत आहेत. खुलकर सीटी वाजवा अशी सूचना असलेले फलक सर्व लॉब्यांमध्ये लावले असून, फॉग सेफ डिव्हाईसच्या कार्यक्षमतेची उपाययोजना करण्यात आली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !