भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे भाऊबीज उत्साहात
Bhusawal Sports and Runners Association celebrates Bhai Beej भुसावळ (25 ऑक्टोबर 2025) : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे महिला व पुरुष धावपटू दर मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी एकत्रीत धावण्याचा सराव करतात. शिवाय देशभरातील वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये देखील एकत्रीत सहभाग नोंदवतात. साहजिकच सर्व सणवार देखील ते एकत्रीत साजरे करतात.
यावेळी भाऊबिजेनिमित्त सर्व महिला धावपटूंनी पुरुष धावपटूंना मैदानावरच ओवाळले, मिठाई खाऊ घातली व भाऊबीज साजरी केली.त्याचबरोबर आपल्या भावांचे दीर्घायुष्य व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली. भावांनी देखील कृतार्थ भावनेने सर्व बहिणींना त्यांना धावतांना प्रत्येक वेळी पाठीशी राहण्याचे वचन दिले. याप्रसंगी सर्व धावपटू 10 किमी एकत्र धावले.





यावेळी जयश्री तिकोटकर, रीना परदेशी, पुष्पा तिवारी, गुंजन गुप्ता, माया पवार, किर्ती मोतळकर, ममता ठाकूर, मंगला पाटील, मनिषा सिंग, विजया निकम, पुष्पा चौधरी, सायली बेंडाळे या बहिणींनी सारंग चौधरी, गणसिंग पाटील, संजय तिवारी, प्रशांत वंजारी, प्रवीण वारके, प्रशांत चौधरी, प्रमोद शुक्ला, मंगेश चंदन, राजीव यादव, प्रविण पाटील या आपल्या भावांना ओवाळले.
