भुसावळ शहरात 31 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Free health check-up camp in Bhusawal city on 31st भुसावळ (26 ऑक्टोबर 2025) : भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त जुना सातारा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाजवळ शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर होत आहे. उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत उपचार
शिबिरात श्री हरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हृदयरोग, बालरोग, सांधे रोग, अस्थी रोग, त्वचारोग, स्त्री रोग, कर्करोग, मधुमेह, हर्निया, अपेंडिक्स, व्हेरीकोसिल, हायड्रोसिल, किडनी स्टोन, पित्ताशयाचे विकार, पोटाच्या विकाराची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येतील. आरोग्य शिबिरामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अतील, असे आयोजक प्रा.धीरज गणेश पाटील यांनी कळविले आहे.





विविध रक्ताच्या चाचण्या मोफत
याशिवाय दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी, मशिनीद्वारे डोळ्यांची संपूर्ण तपासणी, मोतीबिंदू शत्रक्रिया, रक्तातील हिमोग्लोबिन, शुगर, लिव्हर, किडनी, कॅन्सर, थायरॉईड व विविध तपासणी मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांन ीआपले जुने रिपोर्ट सोबत आणावे व परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक प्रा.सीमा धीरज पाटील यांनी केले आहे.
