भुसावळात सरदार वल्लभलाई पटेल जयंती विविध सेवाभावी उपक्रमातून होणार साजरी

उत्सव समितीतर्फे दुचाकी रॅलीसह, वृक्ष रोप वाटप व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन


Sardar Vallabhlai Patel Jayanti to be celebrated in Bhusawal through various charitable activities भुसावळ (29 ऑक्टोबर 2025) : भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती 2025 तर्फे विविध सेवाभावी उपक्रम 30 व 31 रोजी राबवण्यात येणार आहेत.

30 रोजी स्मारकावर आतषबाजी
गुरुवार, 30 रोजी रात्री 12 वाजता भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर आतषबाजी करण्यात करण्यात येईल तसेच स्मारकाचे पूजन व डीजे लाईट शो चे आयोजन करण्यात आले आहे.






शुक्रवार, 31 रोजी शहरात बाईक रॅली
शुक्रवार, 31 रोजी शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयापासून ते लोहपुरूषांच्या स्मारकापर्यंत हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी 10 वाजता स्मारकाजवळ नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.

भव्य आरोग्य शिबिर
शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्सजवळ शुक्रवारी सकाळी 11 ते 1 दरम्यान शहरातील गोल्डन अवर रुग्णालयातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब (बी.पी.), रक्ताची चाचणी (शुगर टेस्ट) तसेच ईसीजी काढून आरोग्याविषयी जागरूकता करीत आहाराबाबत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.

रात्री मान्यवरांचा सन्मान
शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवभोजन केंद्रावर अन्नदान करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता ट्रामा सेंटरमध्ये रुग्णांना फळ वाटप, सायंकाळी मिरवणूक मार्गावर जलवाटप, स्मारक प्रांगणात रात्री आठ ते 10 दरम्यान खिचडी वाटप तसेच स्मारक प्रांगणात रात्री आठ वाजता ज्येष्ठ नागरिक व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांचे आयोजन सरदार वल्ललभाई पटेल जयंती उत्सव समिती 2025 व सकल लेवा समाजबांधव व मित्र परिवारातर्फे करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष धीरज बर्‍हाटे यांनी कळवले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !