निमगाव व टेंभी गावात गुरा-ढोरांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे पशूपालक धास्तावले
यावल (30 ऑक्टोबर 2025) : निमगाव व टेंभी गावात गुराढोरांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे पशू पालक धास्तावले आहेत. येथे एका दिवसात तीन जनावरे दगावली होती व पुन्हा बुधवारी पहाटे एका म्हशीचा मृत्यू झाला. गावातील गुरांढोरांच्या अशा मृत्यूबद्दल प्रशानाकडे कैलाससिंग पाटील, मिलिंद तायडे, बाळू पाटील यांनी तत्काळ माहिती दिली.
डॉक्टरांकडून तपासणी
मंगळवारी स्थानिक डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर बुधवारी येथे पशूवैद्यकीय विभागाचे उपायुक्त डॉ.संजय धांडे, उपायुक्त डॉ.संजय खाचणे, पंचायत समितीचे पशूवैद्यकीय विभागाचे विस्तार अधिकारी डॉ.विवेक गजरे, डॉ.जयलाल राठोड, डॉ. योगेश किंगे, डॉ.वैशाली वानखेडे, पशुसंवर्धन पर्यवेक्षक चेतन ठोंबरे, योगेश नेवे, सुरेश अंगवार, दिग्विजय पाटील, युवराज अडकमोल, नीरज झोपे आदींचे पथक दाखल झाले व त्यांनी गावातील सर्वचं जनवरांची तसेच ज्या गुराढोरांची प्रकृती खराब झाली आहे त्यांची तपासणी करून औषधोपचार केले. त्याप्रमाणे गावात अरुण पाटील यांची म्हैस दगावली होती. त्यांच्या म्हशीचे शवविच्छेदन या पथकाने केले आणि नमुने हे प्रयोग शाळेत पाठवले आहे.





