भुसावळातील नगरपालिकेच्या व्यापारी संकूलाचे काम रखडले

वर्ष उलटूनही एकही वीट रचली गेली नाही


Work on the municipal commercial complex in Bhusawal has been delayed भुसावळ (30 ऑक्टोबर 2025) : केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणूकीसाठी विशेष सहाय्य योजने अंतर्गत बिनव्याजी कर्जातून शहरातील वसंत टॉकीज समोरील सर्वे नंबर 4300 मधील जागेत व्यापारी संकूलाचे काम रखडले आहे. 11 ऑक्टोंबर 2024 रोजी या संकूलाचे भूमिपूजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले होते मात्र अद्यापही या कामाची एक वीटही रचली गेली नाही.

वर्ष उलटूनही कामाला वेग नाही
वसंत टॉकीज समोरील जागेचे भाग्य उजळून या ठिकाणी व्यापारी संकुलाच्या कामाला सुरवात झाली होती. मात्र भूमिपूजन होऊन वर्ष उलटूनही प्रत्यक्षात हे कामाला मुहूर्त गवसला नाही. काही दिवस हे काम सुरू करून नंतर बंद करण्यात आले. आता सहा ते सात महिने उलटूनही काम बंद आहे. शहरात व्यापारीकरणाला चालना देण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी नवीन संकूल अंत्यत महत्वाचे ठरणार आहे. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये संकूलांची उभारणी झाली नाही.






138 दुकानांचे संकूल
10 कोटी 84 लाख 19 हजार 602 रुपयांच्या निधीतून तब्बल 138 दुकानांचे बांधकाम होणार आहे. केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणूकीसाठी विशेष सहाय्य योजनेतंर्गत 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज मंजूर झाले आहे. या रक्कमेतून पालिकेने या व्यापारी संकूल उभारणीचे नियोजन केले. मात्र कामाचा वेग असाच राहिला, तर हे व्यापारी संकूल सुरु कधी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विलंब
व्यापारी संकूलाच्या वर्क इस्टीमेटमध्ये काही बदल होते. यापूर्वीपेक्षा ही वास्तू अधिक दर्जेदार व अधिक काळ टिकावी म्हणून काही बदल करण्यात आले आहेत. या तांत्रिक कारणाने काम थांबले होते. या कामाची लाईन आऊट मंगळवारीच दिली असल्याने कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे पालिकेचे अभियंता पंकज मदगे म्हणाले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !