रन फॉर युनिटी मध्ये धावले शेकडो धावपटूंसह भुसावळकर

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व पोलिस दलाचा संयुक्त उपक्रम


Bhusawalkar along with hundreds of runners ran in Run for Unity भुसावळ (31 ऑक्टोबर 2025) : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व जळगाव जिल्हा पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले. त्यात शहरातील धावपटू, सायकलपटू व विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदविला. शिवाय शहरातील पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिला धावपटूंची संख्या लक्षणीय होती.

यांची होती उपस्थिती
सुरुवातीस कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत डॉ.निलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप व्यायाम घेण्यात आला. त्यांनतर पहाटे 6.30 वाजता बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर, वाहतूक शाखेचे सहा.पोलिस उमेश महाले, भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडी दाखवून रनला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर सर्व धावपटू अतिशय शिस्तीत एकत्र धावत व भारत माता कि जय, वंदे मातरम, सरदार वल्लभभाई पटेल कि जय अशा देशभक्तीपर घोषणा देत शहरातील जळगाव रोडवरील वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ पोहचले. त्याठिकाणी सर्वप्रथम सर्वांनी वंदन करून प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत राधेश्याम लाहोटी यांच्याहस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यांनतर पुन्हा धावायला सुरूवात करून सर्व सहभागी मैदानावर पोहचले.






राष्ट्रीय एकता दिनाची सर्वांनी घेतली शपथ
मैदानावर परतल्यावर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे सर्व अथितीचें स्वागत करण्यात आले व रन फॉर युनिटी निमित्त मार्गदर्शपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक राहुल वाघ व पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनतर सहा.पोलिस निरीक्षक उमेश महाले यांच्यासोबत सर्वांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

याप्रसंगी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संजय भदाणे, प्रशांत चव्हाण, शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार दीपक शेवरे, विनोद विटकर, स्वाती फालक, मंगला पाटील, गणसिंग पाटील, प्रविण वारके, सुयश न्याती, प्रशांत चौधरी, संजय तिवारी, सारंग चौधरी, राजेंद्र ठाकूर, मंगेश चंदन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ चारुलता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, प्रशांत वंजारी, विलास पाटील, नीलांबरी शिंदे यांचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !